ग्रुप ग्रामपंचायत कुंभवली -एकलारे 

ग्रुप ग्रामपंचायत कुंभवली-एकलारे ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हा मधील पालघर तालुका येथे स्थित आहे. ही ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. तसेच रस्ते, गटारे व स्ट्रीट लाईटची देखभाल करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जन्म–मृत्यू नोंदणीची अधिकृत नोंद ठेवणे हेही ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे काम आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. ग्रामसभा आयोजित करून गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात आणि लोकसहभागातून प्रगती साधली जाते.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
 २,३६१
२
पुरुष लोकसंख्या
१,४०२
३
महिला लोकसंख्या
९५९
५
बाल लोकसंख्या (०-६ वर्षे)
२५९
६
साक्षरता दर
 ८७.१६%

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय1होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय1होय
३उपकेंद्र (Sub Center)होय1होय
४अंगणवाडीहोय1होय
५प्राथमिक शाळाहोय1होय
६माध्यमिक शाळाहोय1होय
७उच्च माध्यमिक शाळानाही0नाही
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही0नाही
९समुदाय भवन (Community Hall)होय1होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय 1होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय1होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय1होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)नाही0नाही

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:ग्रुप ग्रामपंचायत कुंभवली-एकलारे 

बँकेचे नाव : बँक ऑफ बडौदा 

शाखेचे नाव:  बोईसर 

अकाउंट नंबर : ३५०३०२००००१८०९ 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :ग्रुप ग्रामपंचायत कुंभवली-एकलारे,

मु. पो. कुंभवली,ता. जि. पालघर (401 501 )